
यावल (प्रतिनिधी )तालुक्यातील सावखेडा सिम येथील रहिवासी दहिगाव तलाठी सजाचे कोतवाल विजय संजय साळवे यांचा वर्षभरात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बाबत तहसीलदार मोहनमाला नाजरीकर यांनी प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला. त्यांच्या या कामगिरी बाबत दहिगाव सजे अंतर्गत असलेल्या ग्रामस्थांकडून स्वागत होत आहे. त्यांचे गौरव बाबत पोलीस पाटील दीपक बडगुजर. दहिगाव चे सरपंच अजय अडकमोल. उपसरपंच देविदास पाटील. तलाठी मिलिंद कुरकुरे. सावखेडा सिम सरपंच बेबाबाई पाटील. उपसरपंच मुबारक तडवी. लक्ष्मण बडगुजर. यांचे सह अनेकांनी स्वागत केले आहे. माझे जसे कार्य सुरू आहे आणि ज्याप्रमाणे शेतकऱ्यांचे कुठलीही अडचण जाणून घेऊ तसेच तलाठी मिलिंद कुरकुरे यांचे मार्गदर्शनाखाली मला सांगितल्या प्रमाणेच मी प्रामाणिकपणे कार्य करीत आहे आणि राहणार. असे महसूल कर्मचारी विजय साळवे यांनी म्हटले आहे.

