

यावल (प्रतिनिधी )भारताचे माजी पंतप्रधान व भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त यावल तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली. तसेच जिल्हा काँग्रेस अध्यक्ष धनंजय भाऊ चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण अभियान व फळवाटपचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
हा कार्यक्रम माजी आमदार शिरीष दादा चौधरी व माजी आमदार रमेश दादा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हाजी चब्बीर शेठ व पंचायत समितीचे माजी सभापती लीलाधर शेठ चौधरी यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला.
यावेळी यावल तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रशांतभाऊ पाटील, शहराध्यक्ष मो. हकीम शेठ, नगरसेवक करीम मेंबर, उमर कच्छी, समीर मेंबर, अझर मेंबर, मझर मेंबर, निसार मोमीन, पराग सराफ, अताऊल्ला शेठ, रफिक टेलर, शफी भाई, शरीफ भाई, अकील सर, अमोल भाऊ भिरुड, टेनु सोनार, असलम मेंबर, महिला तालुका अध्यक्ष कल्पना अजय तायडे, गणेश गुरव सर, फैजपूर युवराज भंगाळे, राजू आस्वार शरद पाटील नईम भाई गिरीश देशमुख सरफराज पिंजरी किरण तडवी सुलोचना तायडे सुनिल पाटील यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

