यावल( प्रतिनिधी) तालुक्यातील सातपुडा पर्वतात भोनक नदीच्या उगमावर असलेल्या प्रसिद्ध निंबादेवी धरणावर पर्यटकांची दैनंदिन गर्दी वाढत आहे याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे , जिल्हाधिकारी तहसीलदार यांनी अनेक वेळा प्रसिद्ध केलेले आहे की पर्यटनावर गर्दी करू नका करणे भरले असतील त्या ठिकाणी गोंधळ करू नका तरी देखील शौकीन पर्यटक मानत नसून येथे मौजमजा करीत असतात. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असणे गरजेचे आहे.
शासनाने अशा पर्यटन स्थळांवर पर्यटकांनी गर्दी करू नये असे आदेश जारी केलेले आहेत. जाण्यास बंदी करू नये या ठिकाणी हजारो पर्यटक मौज मजा लुटण्यासाठी जात आहेत. या ठिकाणी दरवर्षी धरणामध्ये बुडण्याच्या घटना घडत आहे. तरीदेखील पर्यटकांची वाढती गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. या गंभीर बाबींची प्रशासनाने दखल घेत कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.

