
यावल( प्रतिनिधी) तालुक्यातील दहिगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात दहिगाव येथील भाजपा कार्यकर्ते तथा प्रगतशील शेतकरी चेतन प्रकाश महाजन यांची जळगाव जिल्हा भाजपा युवा मोर्चा सदस्य पदावर नियुक्ती केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपसरपंच देविदास पाटील, सदस्य पुंडलिक पाटील, सत्तार तडवी. मयूर पाटील. हेमराज पाटील. अनिल बढे.व व इतर मान्यवर उपस्थित होते. त्यांची ही निवडणूक जिल्हाध्यक्ष पूर्व यांनी केली आहे.निवडीबददल त्यांचे आमदार अमोल जावळे. माझी जि प सदस्य सुरेश देवराम पाटील. खरेदी-विक्री संघाचे चेअरमन नारायण चौधरी. गणेश नेहते जिल्हा बँक संचालक आर जी पाटील. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राकेश फेगडे. चेअरमन उज्जैन सिंग राजपूत. यांचे सहकारी शुभेच्छा देऊन त्यांना कार्य करण्याचा उत्साह दिला त्यांचे अनेक ठिकाणी स्वा गत होत आहे.

