

यावल(प्रतिनिधी) तालुक्यातील दहिगाव व परिसरात काल दिनांक 11 पासून सतत पाऊस सुरू आहे पावसामुळे जागोजागी पाण्याची तलाव भरलेले असून दहिगाव येथील सावखेडा सिम रस्त्यालगत असलेल्या गुरांच्या गोठ्यांमध्ये पाणी शिरले असल्याने चारा पूर्णपणे ओला झाला आहे. हा प्रकार गेल्या अतिवृष्टीतही झाला होता याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या होत्या. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सुद्धा तक्रार केली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तडवी यांनी पाहणी करून म्हटले की हे काम ग्रामपंचायतीच्या हद्दीतील आहे, ग्रामपंचायत याकडे लक्ष देईल. ग्रामपंचायत कडून सांगण्यात येते की हे आमच्याकडे नाही सार्वजनिक बांधकामाकडे आहे. त्यामुळे संबंधित शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत गटारी मधून ओव्हर फ्लो झालेले पाणी निचरा नियोजनाअभावी या गुरांच्या गोठ्यांमध्ये पाणी जात आहे हा प्रकार याच वर्षी होत आहे. संबंधित ठेकेदाराने बांधलेल्या गटारीचा उतार आणि गटारी मधून वाहुन जाणारे पाणी नियोजन करून त्वरित काढावे. आणि परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला वाचवावे अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. गटारीत साचलेल्या पाण्यामुळे
डासांचे उपद्रव वाढले आहे. त्याचप्रमाणे सुरेश आबा नगरा त देखील पाण्याचे तलाव साचत आहेत, या पाण्याचा निचरा त्वरित काढावा आणि होणारे ग्रामस्थांचे त्रास थांबवावे ही जोरदार मागणी होत आहे.

