

यावल( प्रतिनिधी ) पाल्यांनी आपल्या मुलांना सुसंस्कृत घडवून त्यांना सर्व गुणांबाबत मार्गदर्शन करावे. सोशल मीडिया. ए आय. यांचे पासून दूर न जाता त्याचा वापर कोणत्या पद्धतीने करावा, व त्यांच्या ज्ञानामध्ये भर पाडण्याचा प्रयत्न कसा करावा याबाबत आमदार अमोल जावळे यांनी यावल येथे अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती व शिक्षण समिती,यावल तालुका. यांच्यावतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव व पारितोषिक सोहळ्यात मार्गदर्शन केले. त्यांचे हस्ते विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व पारितोषिक (ट्रॉफी)देऊन मनोबल वाढवले तसेच त्यांना भावी जीवनाच्या शुभेच्छा ही दिल्यात. यावेळी “A Textbook of MODERN PHARMACEUTICAL ANALYTICAL TECHNIQUES” लेखिका वैशाली.एम.बडगुजर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन केले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी सुद्धा आपले सर्व शैलीतील गुणधर्म सुसंस्कृत करावेत आणि ज्ञानात भर पाडावी. असेही आमदार जावळे यांनी सांगितले, याप्रसंगी शहरातील तसेच तालुक्यातील समाज बांधव आणि ग्रामस्थ. भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

