
यावल : (प्रतिनिधी) स्वातंत्र्य दिनाचे औचत्य साधून दिव्यांगांच्या समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायत सदैव प्रयत्न करेन त्यांच्या कुटुंबीयांची अडचण व आर्थिक स्थिती बघता आज शुभ दिनी आम्ही त्यांना कीट वितरण करण्याचा उपक्रम राबविला आहे. यापुढे देखील त्यांच्या समस्या आम्ही जाणून घेऊ आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करू असे प्रतिपादन सरपंच मनीषा सोनवणे यांनी याप्रसंगी केले.थोरगव्हाण ग्रामपंचायतीमार्फत दिव्यांग लाभार्थ्यांना पाच टक्के राखीव निधीतून किराणा कीटचे वाटप करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात आला.
ग्रामपंचायतीच्या पाच टक्के दिव्यांग निधीतून गावातील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी किराणा किट उपलब्ध करून देण्यात आले. ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सौ. मनीषा समाधान सोनवणे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना किराणा कीटचे वाटप करण्यात आले.
यावेळी उपसरपंच मीना भरत चौधरी, ग्रामपंचायत सदस्य बाळू पाटील, सूर्यभान पाटील, लताबाई पाटील, वंदनाबाई बापू भालेराव, अनिल कडू भालेराव, चंद्रकांत रामसिंग चौधरी, माजी सरपंच समाधान सोनवणे, ग्रामसेवक जय कोळी यांच्यासह गावातील आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य व विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ग्रामपंचायतीने राबविलेल्या या उपक्रमाचे उपस्थितां कडून कौतुक व दिव्यांगांनी मानले आभार.

