
यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील दहिगाव येथील स्वस्त धान्य दुकानात निघालेल्या प्लास्टिक तांदूळ मिक्स्चर प्रकारात आज दिनांक 23 रोजी पुरवठा अधिकारी अभिमन्यू सराटे आणि सहाय्यक शेख यांनी भेट देऊन तपासणी केली तपासणी अंती त्यांना त्यात पाहिजे तेवढा दोष आढळून आला नाही. तो तांदूळ चॉकी तांदूळ म्हणून ओळखला जातो आणि शासनच त्यात मिक्स करतो आरोग्याच्या दृष्टिकोनातून शरीरात प्रोटीन आणि कॅल्शियम वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो याबाबत आम्ही तीन ते चार ग्राहकांच्या चौकशी करून त्यांचे लेखी म्हणणे ऐकून घेतले आहे, आता आमची कुठलीही तक्रार नाही आमची शंका होती ते निरसन झाली असे ग्राहकांनी म्हटले आहे
तरीदेखील ठेकेदाराने पुरवठा केलेला तांदूळ त्याला परत करून त्याचे कडून नवीन तांदूळ मागणी करून दुकानदाराला तो देण्यात येणार आहे असे पुरवठा अधिकारी अभिमन्यू सराटे यांनी सांगितले. याप्रकरणी ठेकेदाराला ताकीद दिली जाणार आहे असे प्रकार घडता कामा नये आणि चांगल्या प्रतीचा म** दुकानदारांना पुरवावा असेही त्यांनी म्हटले आहे दुकानदारांची यात कुठलीही चुकी नसताना दुकानदारांना मनस्ताप होत आहे त्यात ग्राहकांचे बोलणे ऐकावे लागत आहे. तरी देखील या प्रकाराची शासनाने दखल घेऊन त्वरित निर्वाळा करायला हवा अशी मागणी स्वस्त धान्य दुकानदारांकडून होत आहे. त्यातच नेटवर्क व्यवस्थित चालत नसल्याने दुकानदारांना जास्त काळ दुकानात बसून राहावे लागत आहे. पुरवठा अधिकाऱ्यांनी आम्ही म्हटल्यानुसार ते प्लास्टिकचे तांदूळ होते त्यावर त्यांनी म्हटले की प्लास्टिकचे नसून चॉकी प्रकाराचे तांदूळ आहेत आणि त्यामुळे शरीरात कॅल्शियम आणि प्रोटीन वाढतात यासाठी शासन काही प्रमाणात तांदुळांमध्ये मिक्स करीत असतात त्यामुळे आमची झालेली गैरसम दूर झालेली आहे असे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. छबु पाटील दहिगाव.

