
मोहराळा येथील 26 वर्षीय आदिवासी शेतमजूर बेपत्ता अपहरणाचा संशय. यावल प्रतिनिधी तालुक्यातील मोहराळा येथील 26 वर्षीय आदिवासी शेतमजुर बेपत्ता झाला असून त्याचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आलेला आहे याबाबत यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहराळा येथील नानसिंग बारेला वय 26 हा गेल्या दोन अडीच वर्षापासून गावात त्याची पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्यात होता. मोलमजुरी करून आपला चरितार्थ तो भागवीत होता. मात्र दिनांक 3 रोजी रात्री त्याने आपल्या कुटुंबीयांसोबत जेवण करून रात्री झोप ठोकली सकाळी तो गायब झाला. त्याचा शोध त्याची पत्नी सुनिता मानसिंग बारेला हिने शेजारी असलेल्या सुनील बारेला व सहकाऱ्यांसोबत परिसरात शोध घेतला असता तो मिळून आला नाही. मिळालेले वृत्त असे आहे की त्याचे काही कारणा करिता अपहरण केले असल्याचे संशय आणि दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. याबाबत सुनिता बालेला येणे यावल पोलिसात फिर्याद दिले वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारेला यांची उंची पाच फूट पाच इंच रंगाने सावळा केस कुरडे नाक सरळ दाढी बारीक आणि अंगात पांढऱ्या रंगाचा फुल टी-शर्ट काळी पॅन्ट असे परिधान केलेला आहे. सदर घटनेचा तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोहितददीन सैय्यद, व सहकारी राजेंद्र पवार हे करीत आहेत.

