*दहिगाव येथे राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा*दहिगाव – आज दि 16 मे 2026 या रोजी गावात दरवर्षीप्रमाणे राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा करण्यात आला. जिल्हा आरोग्य अधिकारी मा. डॉ सचिन भायेकर सर, मा. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ प्रमोद सोनवणे सर, तालुका आरोग्य अधिकारी मा. डॉ राजू तडवी सर, तालुका हिवताप पर्यवेक्षक मा. श्री विजय नेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दहिगाव येथे राष्ट्रीय डेंग्यू दिवस 16 मे हा आज रोजी साजरा करण्यात आला. डेंग्यू हिवताप याबाबत जनजागृती करण्यात आली *पाणी साठे तपासणी करणे, स्वच्छ करा आणि झाकून ठेवा डेंग्यू ला हरवण्याचे उपाय करा*. या प्रमाणे जनजागृती केली डेंगू वरील जैविक उपाययोजना गप्पी मासे याबाबत जनतेला माहिती देण्यात आली , गप्पी मासे डबक्यात सोडण्यात आले तसेच हस्त पत्रिका वाटण्यात आल्या, यावेळी आरोग्य सेवक मो.हनिफ तडवी ,आशाताई उपस्थित होते.


