यावल (प्रतिनिधी )आदिवासी एकता मंच ची आज यावल येथे आज सभा घेण्यात आली, यात समाजाच्या विविध समस्या सोडवण्यावर चर्चा झाली प्रामुख्याने यावल व रावेर तालुक्यातील तडवी भिल्ल समाजातील रेशन कार्ड आहेत, मात्र अद्याप अंत्योदय योजना व अन्नधान्य मिळत नाही, अशा बांधवांकरिता लवकरच लढा उभा करायचा ठरले,
तसेच याप्रसंगी आदिवासी दिन पूर्वतयारी आढावा घेण्यात आला,
सावदा येथील युवा पदाधिकारी युनुस तडवी यांची जिल्हा सदस्य पदी निवड करण्यात आली, सांगवी येथील राजू तडवी यांना तालुका सदस्य निवड केली , निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला,

शोएब तडवी , हसन तडवी यांनी यांनी एकता मंच मध्ये प्रवेश केला
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष मेहरबान तडवी तसेच बुलढाणा जिल्हाध्यक्ष सत्तार तडवी विदर्भ प्रमुख युनूस तडवी बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष आशिफ तडवी तसेच जळगाव जामोद तालुका अध्यक्ष कलीम तडवी यांची विशेष उपस्थिती लाभली
याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष सब्दल तडवी, पत्रकार तसेच प्रसिद्धी प्रमुख मन्सूर जिल्हा सचिव फतू तडवी जिल्हा सहसचिव जुम्मा तडवी जिल्हा संघटक भुसावळचे सलमान तडवी जिल्हा संघटक रब्बील तडवी जिल्हा सदस्य कुर्बान तडवी सांगवी यावल तालुका सदस्य युसुफ तडवी यावल तालुका उपाध्यक्ष फिरोज तडवी यावल तालुका सदस्य सुपडू तडवी जिल्हा सदस्य अमित तडवी यावल परतुर येथील सद्दाम तडवी साकळी येथील दीपक तडवी महिला जिल्हाध्यक्षा मुन्ना ताई दळवी महिला जिल्हा उपाध्यक्ष रेहनाताई तडवी तसेच मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते

