
यावल ( प्रतिनीधी ) बुधवार दि.२० मे रोजी ऑल इंडिया केमिस्ट बंद बाबतीत यावल पोलीस स्टेशनला यावल तालुक्यातील औषध विक्रेत्यांनी बंद बाबत निवेदन दिल ऑनलाईन औषध विक्रीला विरोध,कॉर्पोरेटर्सच्या मनमानीला विरोध व बनावट औषधांच्या धोक्याविरुद्ध लढा या विषयावर हे बंद पाळण्यात येत असल्याचे ऑल इंडिया केमिस्ट चे जळगाव जिल्हा अध्यक्ष सुनील भंगाळे व सचिव अनिल झंवर यांनी सांगितले जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील केमिस्ट बांधव या बंद बाबतीत आपले निवेदन सादर करत आहेत त्यातच यावल तालुकाध्यक्ष मनीष कौठळकर दिलीप महाजन प्रशांत कासार भानुदास महाजन जिल्हा कार्यकारणी सदस्य नितीन महाजन,श्रीराम मुरलीधर धनगर तोसिब रजा यांनी यावल येथे तर उपाध्यक्ष जाबीर खान सचिव संजय चौधरी, कार्यकारणी सदस्य चंदन महाजन व मनीष चौधरी यांनी फैजपूर पोलीस स्टेशनला सदरच्या बंद बाबतीत निवेदन दिले.

