यावल ( प्रतिनिधी ) शहरात गेल्या काही दिवैसां पासुन चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून,दिनांक १६ मे रोजी दिवसाढवळे दुपारच्या वेळेस एका बंद घरात चोरी झाली असुन, यात घरातील दागीने व रोकड अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे . या संदर्भात मिळालेली माहीती अशी की ,यावल शहरातील विस्तारित वसाहती मधीलआयशा नगर परिसरात राहणारे आरोग्य कर्मचारी अब्दुल रज्जाक सत्तार देशपांडे यांच्या घरात त्यांची पत्नी राहात असुन आज वाडयात दिनांक १६ मे रोजी दुपारी १ वाजेच्या दरम्यान एका लग्नाच्या ठिकाणी जेवणास गेल्या असता बंद पाहून अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाच्या कुलुप तोडून आत प्रवेश करीत घराच्या मागील खोलीतील एका कपाटातील ठेवलेले सोन्याचे दागीने व काही रोकड पैसे चोरून नेल्याची घटना समोर आली आहे . या बाबत ची माहिती मिळताच पोलीसांनी चोरी झालेल्या घराची पाहणी करून पंचनामा केला असून अद्याप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला न सुन,घर मालक रज्जाक देशपांडे हे बाहेर गावी गेले असून ते घरी आल्यावर त्यांनी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयांच्या विरूद्ध तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलीस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्ग दर्शना पोलीस तपास करीत आहे .


