मालोद शिवारात विजेच्या शॉक सर्किट मुळे मका व ठिबक नळ्या जळून खाक पावणे दोन लाखाचे नुकसान. यावल( वा) तालुक्यातील मालोद शिवारात किनगाव येथील शेतकऱ्याचे मकीच्या शेतात शॉक सर्किट मुळे आग लागून पावणेदोन लाखाचे नुकसान झाल्याची घटना दिनांक 18 चे सायंकाळी घडली याबाबतचा पंचनामा कृषी सहाय्यक कैलास बारेला आणि तलाठी मनीषा बारेला यांनी केला आहे. किनगाव येथील रहिवासी सायबू नथू तडवी यांचे मालोद शिवारातील शेतात केळीच्या बागेत मका लागवड केली होती मकीच्या पिकाचे कणसे तोडून ढिगारा मारला होता तर मकीचा कळबा अजून बांधणे बाकी होते. मात्र दिनांक 18 चे सायंकाळी विजेच्या शॉक सर्किट मुळे अचानक आग लागल्याने यातील केळीच्या बागेत अंथरलेल्या ठिबकच्या नळ्या सुमारे ७ ० हजार रुपये किमतीच्या पाईप सुमारे 35 हजार रुपये किमतीचे आणि मका साठ हजार रुपये किमतीचा याव्यतिरिक्त कडबा जळून खाक झाला, याप्रकरणी मुबारक तडवी यांनी महसूल व कृषी विभागाला तक्रार केल्यानुसार तलाठी मनीषा बारेला आणि कृषी सहाय्यक कैलास बारेला यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा केला आहे. सध्या विजेच्या शॉक सर्किट मुळे अनेक ठिकाणी असे प्रकार घडत असल्याचे दिसून येत आहे,


