यावल प्रतिनिधी. किनगाव येथील गरीब कुटुंबातील मुलीने घरच्या घरी अभ्यास करून महाराष्ट्र राज्य पोलीस भरती उत्तीर्ण होऊन तिची निवड करण्यात आली आहे त्याबद्दल तिचा सन्मान गावकऱ्यांमार्फत करण्यात आला आहे,
महाराष्ट्र पोलीस भरतीची प्रक्रिया १२ मार्च रोजी नायगाव मुंबई.येथे संम्पन झाली यात किनगाव येथील रोहिणी अंकुश कोळी तिची निवड झाली सर्वसामान्य परिवारातील रोहिणीचे इ.१ ते ४थी पर्यंतचे शिक्षण जि.प.मराठी शाळा व इ.५ वी ते इ.१०वी पर्यंतचे शिक्षण नेहरू विद्यालय किनगाव येथे झाले त्यानंतर रोहिणीने बेंडाळे कॉलेज जळगाव येथे ११ वी व १२ वी कामर्स केले तर नुकतेच तिने एफ. वाय.बी.ए.लाप्रवेश घेतला शिक्षणादरम्यानच रोहिणीने दररोज रनिंग,व्यायाम,गोळाफेक व भालाफेक अशी स्वतः प्रॅक्टिस केली विशेष म्हणजे तिने यासाठी कोणतेही स्पर्धा परीक्षांचे क्लासेस लावले नाहीत व तिला कोणाचीही मदत मिळाली नाही तीने ३ वर्ष एन. सी.सी.केले होते दररोज शिक्षणासाठी किनगाव ते जळगाव बस ने प्रवास करून मिळेल त्या वेळेत रोहिणी पोलीस भरतीची तयारी करत होती व घरीच अभ्यास करत होती पोलीस भरतीसाठी अभ्यास व सराव करत असतांना रोहिणीने निश्चित केले होते की मी नक्कीच महाराष्ट्र पोलीस सेवेत भरती होईल व माझ्या आई-वडिलांचे दिवस पालटतील आणि १२ मार्च रोजी तो दिवस उजाडला व अवघ्या २० वर्ष वयात मुंबई पोलीस मध्ये रोहिणीची निवड झाली व किनगावची कन्या रोहीणी अंकुश कोळी पोलीस झाली रोहीणीच्या परिवारात कोणीही शासकीय सेवेत नाही रोहीणी पोलीस झाल्याने आजी हिराबाई कोळी आजोबा जगन्नाथ कोळी काका विनोद कोळी काकू कविता कोळी वडील अंकुश कोळी व आई छायाबाई कोळीसह रोहीणीच्या भावंडानां खुप आनंद झाला.आहे.
रोहिणीची मुंबई पोलीस मध्ये निवड झाल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला यावेळी किनगाव खुर्द चे सरपंच बबलू जनार्दन कोळी इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलचे सचिव व व्हि.मार्टचे संचालक मनिष विजयकुमार पाटील माजी सरपंच नवल कोळी माझी जि.प.सदस्य नबाब तडवी माजी प.स.सदस्य रवींद्र ठाकूर,अशोक कोळी,जिवन कोळी,राहुल सोनवणे,साजिद शहा,संतोष पाटील,मिलिंद कोळी,पांडुरंग तेली,पप्पू न्हावी,सुरेश सोनवणे, विनोद कोळी,पिना कोळी पत्रकार आर.ई.पाटीलसर,नितीन बडगुजर,सुरेश पाटील,महेश पाटील व अनिल भोई, सुनिल पिंजारी इ. सह ग्रामस्थ उपस्थित होते.रोहीणीची निवड झाल्याने तिचे सर्वत्र कोतुक होत आहे.


