यावल प्रतिनिधी तालुक्यातील दहिगाव येथील आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक पी बी पाटील यांचा आज 31 मे रोजी 28 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्तीचा कार्यक्रम पार पडला अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील होते तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रप्रमुख विजयकुमार ठाकूर होते, यावेळी संस्थेचे राजाराम महाजन, मनोहर महाजन, सोमनाथ महाजन, वेडू पाटील, श्रीकृष्ण पाटील, एल एम चोपडे सर, उपसरपंच देविदास पाटील माजी पोलीस पाटील संतोष पाटील, यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते, तसेच त्यांचे आप्त नातेवाईक, लोकप्रतिनिधी सर्व शिक्षक वृंद व सत्कार करते विद्यार्थी यांची विशेष उपस्थिती होती, कार्यक्रमात बी,पी पाटील यांचा कार्यकाळ, आणि त्यांनी त्यांच्या तीन वर्षाच्या कालावधीत मुख्याध्यापक पदावर असताना शाळेची केलेली प्रगती याबाबतचा लेखाजोखा करण्यात आला, प्रसंगी पी,बी पाटील यांनी, आपण गरिबीतून कसे दिवस काढीत या पदावर पोहोचलो याबाबतचा पूर्वार्ध मांडला, तर अजय पाटील सर व्ही बी पाटील सर, मीना तडवी यांनी आपले मनोगत प्रकट केले सूत्रसंचालन वि बी पाटील प्रास्ताविक अजय पाटील आणि आभार चौधरी सर यांनी मांडले.



