यावल वा / को रपावली येथील घरकुल इंजिनिअर याची बदली करण्याबाबत पंचायत समिती गटविकास अधिकारी यांचे कडे माजी सरपंच दत्ता प्रशासक विलास अडकमोल यांची तक्रार.
सविस्तर वृत्त असे की कोरपावली येथील घरकुल इंजिनियर हर्षल चौधरी हे घरकुल लाभार्थ्यांकडून जोपर्यंत आर्थिक लाभ होत नाही, तोपर्यंत त्यांचे जिओ टॅगिंग चे फोटो काढत नाहीत तसेच जिओ टॅगिंग फोटो काढण्यासाठी खूप विलंब लावत आहे त त्यासाठी कोरपावली माजी सरपंच तथा प्रशासक विलास नारायण अडकमोल यांनी त्यांचा तक्रारी अर्ज पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्यांच्या या अर्जाकडे नव्याने सहाय्यक गटविकास अधिकारी काय कार्यवाही करतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.


