यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील दिव्यांग बाधवांसाठी शासनाच्या विविध योजनाचा लाभ मिळणे साठी माहिती व शिबीराचे भव्य आयोजन दिनांक 21 रोजी यावल येथील शेतकी संघात सकाळी दहा वाजता करण्यात आलेले आहे, या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपाचे दिव्यांग आघाडी जळगाव जिल्हा पूर्व अध्यक्ष अरुण पाटील यांनी केलेले आहे, हे शिबिर सकाळी दहा ते एक वाजे दरम्यान सुरू राहील आमदार अमोल जावळे यांचे वाढदिवस सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आले आहे. शिबिरात दिव्यांग बाधवासाठी १ ) ईरिक्षा २ बॅटरीक साईकल ३ ) इलेट्रीक मोटार साईकल ४ ) नास्ता सेंटर ५ ) काठी ६ ) कुबळ्या ७ ) ऑर्फीयंत्र ८ ) व्हीलचेअर वैगेरे बाबतीत मोफत फॉम भरले जाणार आहे त्यासाठी सोबत येतांना दिव्यांग बाधवानी १ ) सर्टीफीकेट झेरॉक्स २ ) युडीआयडी कार्ड झेरॉक्स ३ ) आधार झेरॉक्स ४) १ पासपोर्ट फोटो ५) मो नंबर घेऊन दिव्यांग बाधवांनी उपस्थित रहावे, दिव्यांगांचे भरलेले अर्ज हे जिल्हाधिकारी जळगांव यांच्याकडे . पाठवले जाणार आहे तरी दिव्यांग बाधवांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे अवाहन अरुण पाटील नायगावंकर यांनी केलेले आहे, यासाठी 9767372017 या क्रमांकावर संपर्क करावा असेही त्यांनी कळविले आहे.


