यावल (प्रतिनिधी )तालुक्यातील दहिगाव येथील पी, एम, श्री, जि प प्राथमिक शाळेतील इयत्ता तिसरी मधील विद्यार्थिनी डिंपल दीपक निकम ही महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये यावल तालुक्यामधून पहिल्या क्रमांकाने आणि राज्यातील तेहतीसाव्या क्रमांकावर उत्तीर्ण झाली आहे, तिचा सन्मान केंद्रप्रमुख विजय कुमार ठाकूर यांनी ट्राफि देऊन केला. तिला केंद्रप्रमुख विजयकुमार ठाकूर , वर्गशिक्षिका सोनाली चौधरी, आई वडील यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले, तिच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक विजय पाटील, सर्व शिक्षक रुंद व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्यांनी आणि गावकऱ्यांमधून कौतुक केले आहे. सन्मान करते वेळी माजी ग्रामपंचायत सदस्य सत्ता तडवी, मुख्याध्यापक विजय पाटील, व सर्व आणि व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते,



