
यावल (प्रतिनिधी )तालुक्यातील सावखेडा सीम येथे किनगाव साकळी भाजपा मंडळाच्या वतीने जिल्हा परिषद मराठी शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी योगाचे महत्त्व विशद करत निरोगी जीवनासाठी योगाचा अवलंब करण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी योग प्रशिक्षकांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिक सादर केले. सूर्यनमस्कार, प्राणायाम, ध्यानधारणा यांसारख्या योगप्रकारांचा सर्वांनी उत्साहाने सराव केला. योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते, तणाव कमी होतो आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून राकेश वसंत फेगडे (जिल्हाध्यक्ष सहकार आघाडी), उजैनसिंग राजपुत (सभापती कृ.उ.बा यावल), मंडल अध्यक्ष अनिल पाटील तसेच वामन सोनवणे, योगेश खेवलकर, देविदास पाटील, शैलेंद्र पाटील, मयूर पाटील, दिनेश पाटील, नागेश्वर साळवे, सलिम तडवी सर, भूषण पाटील, डॉ. सुनील पाटील व किनगाव साकळी मंडळातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी नियमित योगाभ्यास करण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाचे आयोजन किनगाव साकळी भाजपा मंडळाच्या वतीने करण्यात आले असून, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. शेवटी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

