
. यावल ( प्रतिनिधी) तालुक्यातील सावखेडा सिम शिवार अंतर्गत लसूण बर्डी येथील आदिवासी घरगुती बियाण्याची तपासणी करण्यास सज्ज. मान्सूनच्या आगमनाने तालुक्यात सर्वच शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे, आता बियाणे खरेदीकडे शेतकरी वळले आहेत, तर काही शेतकरी घरगुती बियाण्याकडे ही कल देत आहेत. त्यातच आदिवासी पावरा समाजाचे लसुनबर्डी येथील शेतकरी सोयाबीन बियाण्याचे 1135 वाण घरी त्याची तपासणी करीत आहेत, पोत्यांवरती माती टाकून त्यात शेतीप्रमाणे नियोजन करीत बियाणे टाकून त्याची तपासणी करीत आहेत बियाणे कसे आहेत याचा निकष त्यांना तत्काळ काही दिवसातच मिळेल असे त्यांचे म्हणणे आहे, कृषी सहाय्यक कैलास बारेला यांनी तेथे भेट देऊन त्यांची चौकशी केली आणि पाहणी केली, गरजे बियाणे उत्तम आहे किंवा चुकीची आहे याचा निकष तत्काळ बियाणे उगल्यावर समजेल, त्यानुसार ते पेरणी करतील, या शेतकऱ्यांचा कल मात्र सोयाबीन पेरणीकडे गेलेला दिसत आहे, झालेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे, रासायनिक खते आणि बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रांवर त्यांची ओघ वाढलेली आहे, येत्या तीन ते चार दिवसातच पेरणीला सुरुवात होईल, तर कापूस आणि मका पेरणीचा मार्ग मात्र मोकळा झालेला आहे,

