
यावल ( प्रतिनिधी)तालुक्यातील बामणोद येथील प्राकृतिक शिक्षण मंडळाच्या पी. एस. एम. एस .स्कूल व ज्युनिअर कॉलेज चा ८० वा वर्धापन दिनानिमित्त झाडे जगविणाऱ्या विद्यार्थ्यास पाचशे रुपयाचे बक्षीस जाहीर करण्यात येऊन विद्यार्थ्यांमध्ये उत्साह वाढवण्याचे प्रयत्न करण्यात आले आहे, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.शी मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र कोल्हे होते तर प्रास्ताविक ,मुख्याध्यापक व प्राचार्य बी एस हजबंन सरानी केले. विद्यार्थ्यांनी शाळेविषयी मनोगत व्यक्त केले. शाळेची माजी विद्यार्थिनी स्वीटी तायडे या विद्यार्थिनीने देखील आपले मनोगत व्यक्त केले. पर्यवेक्षक जी एच जावळे जेष्ठ शिक्षिका रजनी झांबरे यांनी शाळेचा इतिहास सांगितला व मनोगत व्यक्त केले. शालेय गीते, निबंध स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी भविष्याकडे वाटचाल कशी करावी याबाबत मार्गदर्शन झाले.
सूत्रसंचालन बी.एम.लहासे यांनी केले तर आभार चेतना चौधरी यांनी केले संस्थेचे चेअरमन डॉक्टर जे.डी .भंगाळे व्हाइस चेअरमन देविदास तळेले मुख्याध्यापक प्रागतीक प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
सर्व विद्यार्थ्यांना . मुख्याध्यापकां कडून चॉकलेट वाटप करण्यात येऊन. स्पर्धेतील विद्यार्थ्यांना पेन बक्षीस देण्यात आले तसेच ‘एक विद्यार्थी एक रोप लावावे ‘ आणि झाड जगवावे झाड जगणाऱ्या विद्यार्थ्यास पाचशे रुपये रोख बक्षीस दिले जाईल असेही आव्हान मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना केले .शाळेचा विद्यार्थी सोहम कोल्हे या विद्यार्थ्याचे राष्ट्रीय पातळीवर ‘तायकांदो ‘या स्पर्धेत निवड झाल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला.

