यावल ( प्रतिनिधी) यावल पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक पदावर कर्तव्यदक्ष सेवा पार पाडीत त्यांची इतरत्र बदली झाली मात्र ते आज उपविभागीय अधिकारी पदोन्नतीवर गेलेले असून आज रोजी त्यांना मालेगाव ग्रामीण आणि साकरी धुळे ग्रामीण येथे जबाबदारी दिली आहे, त्यांच्या या पदोन्नतीने यावल शहरात व तालुक्यात त्यांचे स्वागत केले जात आहे ,आणि यावल शहराचा अभिमान आहे असे नागरिकांकडून वर्तविले जात आहे, यावल पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष अधिकारी रंगनाथ धारबळे यांचाही पदोन्नतीकडे जाण्याचा मार्ग मोकळा झालेला दिसून येत आहे. यावल शहरात पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्यांनी शिस्त जनतेशी संवाद अनेक गुन्हे उघडकीस, आणल्या प्रकरणाची त्यांची ही पावती त्यांना मिळालेली आहे. राकेश मान गावकर, तसेच सुधीर पाटील हे पोलीस निरीक्षक पदावर यावल येथे होते ,त्यांनी त्यांच्या कार्यकाळात यावल शहरातील व तालुक्यातील जनतेशी वेळोवेळी सुसंवाद साधून शिस्त लावून त्यांच्यात मिसळून आपली वेगळीच ओळख निर्माण केली होती, त्यांच्या या श्रेयाचे फळ त्यांना आज मिळालेले आहे, पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर, यांची मालेगाव ग्रामीण येथे पोलीस उपविभागीय अधिकारी (डी वाय एस पी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांची साकरी धुळे ग्रामीणसाठी डीवायएसपी पदावर पदोन्नती होऊन नियुक्ती करण्यात आलेली आहे, दोघ अधिकाऱ्यांनी यावलला कायदा सुव्यवस्था जनतेशी सुसंवाद राखुन जनतेत मिसळून कामे करीत अनेक गुन्हे उघडकीस आणले होते, त्यांचे श्रेय त्यांना आज मिळालेले आहे, अशी भावना यावलकरांमधून व्यक्त केली जात आहे. त्याचप्रमाणे सद्यस्थितीत असलेले यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे हे देखील यावल शहरासह तालुक्यातील जनतेशी वेळोवेळी सुसंवाद साधित प्रत्येकाचे म्हणणे ऐकून प्रत्येकाच्या समस्या सोडवून त्यात त्यांचेत मिसळून अनेक गुन्हे उघडकीस आणित आहेत फरारी आरोपींना तत्काळ अटक करीत आहे, सामाजिक दृष्टिकोनातून गस्त घालीत असताना व आपले कर्तव्य बजावित अल्पवयीन मुलींना पालकांच्या स्वाधीन करणे, खून प्रकरण असो दरोडा प्रकरण असो रस्ता लूट असो यातील आरोपींना तत्काळ अटक करणे, जनतेशी वेळोवेळी संवाद साधने आणि तालुक्यात शांतता अबाधित ठेवणे, अशा या त्यांच्या कर्तुत्वाने त्यांचाही पदोन्नतीचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे असे मत व्यक्त केले जात आहे, यावल पोलीस ठाण्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांना यावल शहर फलदा यी ठरत आहे, पोलीस ठाणे असो की तहसील असो येथील तहसीलदार सुद्धा येथून बदली झाल्यावर त्यांच्या पदोन्नती झालेल्या आहेत आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या सुद्धा आणि आज रोजी हे अधिकारी राज्यात आपले नावलौकिक करीत आहेत हा यावल शहराचा अभिमान आहे, अशा भावना यावलकर व्यक्त करीत आहेत, झालेल्या पदोन्नतीमुळे यावल शहरात आनंद व्यक्त केला जात आहे, अशा या गुणवंत अधिकाऱ्यांचा यावल शहराला व त्यांच्या यशाचा प्रेरणादायी प्रवास करत असल्याच्या प्रतिक्रिया तालुका वाशी व्यक्त करीत आहेत,
[२८/६, २:३७ PM] chaudharijivan819: यावल पोलीस ठाण्याचे माजी दोन पोलीस निरीक्षकांना मिळाली पदोन्नती, रंगनाथ धारबळे यांचाही पदोन्नतीचा मार्ग मोकळा होणार,


