
यावल(प्रतिनिधी) तालुक्यातील दहिगाव परिसरातील सावखेडा सिम, कोरपावली, मोहराळा, हरिपुरा, महेल खेडी, येथे मशिद मध्ये सेवा करणाऱ्या मौलाना लोकांसाठी लोक वर्गणी करून त्यांना त्यांचे मानधन देण्याची परंपरा सुरू आहे. यासाठी समाज प्रत्येक कुटुंबा कडून सरासरी वर्गणी जमा करीत आहे, दहिगाव येथे प्रत्येक घराला एक हजार रुपये वर्गणी जमा करून मौलाना यांची मेहनतनामा जमा करीत असतात, मोहरम ते मोहरम ही वार्षिक परंपरा आहे, मोहरम सण साजरा होताच समाज बांधव कमिटी एकत्र जमली आणि वर्गणी जमा करण्यास सुरुवात केली आहे, यात प्रामुख्याने माजी ग्रामपंचायत सदस्य मुक्तार खान, मनोहर पटेल सत्तार तडवी, हबीब खान, यांचे सह अनेकांनी सहभाग घेतलेला आहे, वर्षाचे एक लाख रुपये मौलानांचे मानधन आहे, गरज पडली त्यांना वर्षातून वेळोवेळी पैसे जमा करून द्यावे लागत आहेत, शासनाकडून कुठलाही निधी नसल्यामुळे समाजाला एकत्रित जमून पैसे लोकवर्गणीतून जमा करावे लागत असतात, काही ठिकाणी महिन्या परत , तर काही ठिकाणी सणा सणानुसार लोकवर्गणी जमा केली जाते, या एकत्रित एकोप्याने मौलानांचे मानधन मात्र त्वरित जमा होत असते. शासनाने मशिदीमध्ये काम करणाऱ्या मौलानांकरीता निधी उपलब्ध करावा अशी अपेक्षा मात्र समाज बांधव करीत आहेत म्हणजे गोरगरीब कुटुंबाला यापासून सुटका मिळेल असे कमिटी संचालक मुक्तार खान पठाण यांचे म्हणणे आहे,

