
यावल (प्रतिनिधी)तालुक्यातील दहिगाव सह तालुक्यात प्रहार दिव्यांग क्रांति संघटना संस्थापक अध्यक्ष मा ना आमदार बच्चूभाऊ कडू मा राज्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसाच्या निमित्त प्रहार दिव्यांग क्रांति संघटना यावल तालुक्यात विविध कार्यक्रम घेण्यात आले यात दहिगाव येथे तालुक्याच्या वतीने व कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमानाने विना मुल्य नेत्र तपासणी, मोती बिंदु चिकित्सा व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे शिबीरात 42 जणांनी याचा लाभ घेतला व 12 मोतीबिंदू रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया साठी जळगांव येथे नेण्यात आले कांताई नेत्रालय जळगांव टीम डाॅ योगेश माळी, अदनाम शेख, अनवर मलीक ही टीम यांनी काम पाहिले कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यलय दहिगांव येथे घेण्यात आला सकाळी 9 ते 1 या वेळेत शिबिर पार पडले, तर आदर्श विद्यालय दहिगाव येथे पेन वह्या बिस्किट वाटप करण्यात आले याप्रसंगी प्रहार दिव्यांग क्रांति संघटना यावल तालुका अध्यक्ष हरीभाऊ विजय पाटील, प्रतिक वासुदेव पाटील उप अध्यक्ष,कैलाश पाटील, ललित पाटील ता सचिव,हेमचंद्र चौधरी अटरावल, रामदास पाटील डोंगर कठोरा, वासुदेव बडगुजर साकळी, महिला यावल शहर अध्यक्ष मिनाबाई जनार्दन देशमुख, सपना संदीप वायकोळे यावल, सुरेश पाटील दहिगांव, चन्द्रकांत पाटील, पंढरीनाथ पाटील, पवन पाटील, डेव्हीड महाजन वस्तीगृहाचे अधीक्षक एन के पाटील उपस्थित होते तसेच यावल येथील यशोदाई फाऊडेसन वॄदआश्रम सेवा केन्द्र यावल येथे फळ वाटप केले व आम्ही तेथील सचिव विजय भाऊ सावकारे यांची भेट घेतली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या

