

. यावल(प्रतिनिधी) यावल फैजपूर रस्त्यावरील हिंगोणा सांगवी दरम्यान आयशर पलटी होऊन 25 मजूर जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान घडली. जखमीवर यावल रुग्णालयात उपचार करण्यात आले. 15 जखमींना जळगाव येथील सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले, सोमवारी सकाळी नऊ वाजता दरम्यान सातपुड्यातील कुंड्या पाणी येथील आदिवासी मजूर न्हावी येथे शेतात काम करण्यासाठी आईसर गाडी क्रमांक एम एच 43 बीबी 12 64 हिचे मधून जात असताना सांगवी हिंगोणा दरम्यान आयशर गाडीचे पुढील चाक फुटल्याने ती पलटी झाली यात 25 मजूर जखमी झाले आहेत. जखमींना भीम आर्मीचे कार्यकर्ते सागर मेघे पंकज डांबरे सचिन पारधी ,बबलू गजरे ,आदींनी 108 रुग्णवाहिका बोलवून तत्काळ यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. जखमींवर वैद्यकीय अधिकारी तुषार सोनवणे प्रज्वल सर एम ओके परिचारिका लीना राणे सि कोल्हे अडकमोल आदींनी तत्काळ उपचार सुरू केले. 25 जखमींपैकी 15 जखमींना जळगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे तर दहावर यावल ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये जगन पावरा,शहनाज तडवी आसिफ तडवी राधा पावरा शितल पावरा मेहंदी पावरा खेमा पावरा महिमा पावरा मंगला पावरा अनिता पावरा विराज पावरा नजरुद्दीन तडवी ,मीना पावरा ,विरूलाल पावरा, गिरा पावरा, शहनाज तडवी सुनिता पावरा ,वाकी पावरा हुरी पावरा आसिफ तडवी यांचे सह अनेकांचा समावेश आहे, मजूर वाहून नेणारे वाहन चालकाचे प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

