
यावल शहरासह दहिगाव सावखेडा सिम येथे कुत्र्यांचा हायदोस अनेकांना घेतला जावा नागरिक त्रस्त यावल(प्रतिनिधी) यावल शहरासह तालुक्यात मोकाट कुत्र्यांचा हैदोस निर्माण झाला असून शाळकरी विद्यार्थ्यांना त्याचा मोठा त्रास होत आहे त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांची होत आहे. यावल शहरासह तालुक्यातील दहिगाव सावखेडा सिम आदी गाव खेड्यांमध्ये कुत्र्यांचे मोठे प्रमाण वाढलेले आहे. हे सार्वजनिक चौकात रिक्षांच्याखाली किंवा आडोशाला तसेच भर रस्त्यावर मस्ती करत असतात. शाळकरी विद्यार्थ्यांना फार मोठा त्रास होतो अनेक विद्यार्थ्यांना कुत्र्याने चावा ही घेतलेला आहे त्यात ते गंभीरही झाले आहेत, अशा कुत्र्यांचा नगरपालिका आणि ग्रामपंचायतीने त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी त्रस्त आल्यांची आणि ग्रामस्थांची होत आहे. त्यांच्यामुळे गावात घाणीचे साम्राज्य सुद्धा पसरत आहेत . ताडेचे तांडे कुत्रे भटकंती करत असतात, अनेकांच्या कुटुंबांना हे त्रास देत असतात. पिकांचे नुकसान होते, त्यामुळे शेतकरी सुद्धा वैतागले आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांना चावा घेतल्यावर त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. याकरिता त्वरित बंदोबस्त व्हावा अशी जोरदार मागणी होत आहे, यावल शहरांमध्ये एकाच ठिकाणी प्रमुख रस्त्यावर चोवीस कुत्रे आणि एक कुत्री असतांड उभे राहून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांच्या मागे लागतात वाहनधारक घाबरतात आणि फेकलेही जातात. त्यात ते जखमी होतात. तसेच संध्याकाळी दोन दिवसांपूर्वी एका दोन वर्षीय चिमुकलेला आहे चावा घेतलेला आहे ती त्यात गंभीर जखमी झाली आहे यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

