
यावल (प्रतिनिधी )तालुक्यातील किनगाव येथील अंध मातेला व मुलाला पती आणि सासू यांचे मनाविरुद्ध सुनेने मुलाला जन्म घातला या रागातून विहिरीत ढकलले प्रकरणी यावल पोलिसात सासू आणि पती यांचे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किनगाव येथील रहिवासी स्वप्निल भागवत पाटील हल्ली मुक्काम नाशिक हा कामानिमित्ताने आपल्या पत्नीसह मुलाला घेऊन किनगाव येथे आला होता, दिनांक 13 जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजेचे सुमारास किनगाव बुद्रुक शेत शिवारातील गट क्रमांक 123 मधील त्याचे मालकीचे शेतात त्याचे कुटुंब गेले असता. त्यांना पूजेसाठी असलेले पाणी विहिरीत टाकून ये असे सासूबाई आशा भागवत पाटील यांनी सांगितले. त्यावरून मुलाला घेऊन सुन विहिरीजवळ गेली असता फिर्यादी चा पती स्वप्नील व आई आशाबाई यांनी संगनमत करून तिला विहिरीत ढकलले. साडेतीन वर्षाचा बालक कृष्णा स्वप्निल पाटील हा विहिरीत पाण्यात बुडून मयत झाला, तर आई विहिरीत लाकडाचा वापर करीत बचावली.
तिला जळगाव येथे सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेले असता उपचार केल्यानंतर आणि मुलाचा अंत्यविधी आटोपल्या नंतर स्वतः फिर्यादी सरस्वती बाई स्वप्नील पाटील वय 26 राहणार किनगाव नाशिक सप्तशृंगी देवी मंदिराजवळ हिने यावल पोलिसात तक्रार दाखल केली. यात तिने म्हटले आहे की मी व माझे पती अंध आहेत आमचं बाळ सुद्धा जन्माला अंध येईल असे डॉक्टरांनी सांगितले होते. परंतु मी जन्म दिल्याने सासुबाई हिच्या मनात राग होता त्या रागाने तिने व तिच्या मुलाने मला विहिरीत ढकलले यात माझा मुलगा कृष्णा मयत झाला आहे. अशा फिर्यादीवरून यावल पोलिसात गुन्हा रजिस्टर नंबर 254/26 भादवि कलम 103(1), 109(1)3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अनिल महाजन व सहकारी करीत आहेत.

