
यावल( प्रतिनिधी )येत्या ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदी वासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी यावल शेतकी संघाच्या सभागृहात आदी वासी टोकरे, ढोर, महादेव, मल्हार कोळी जमात बांधवांची बैठक समाजाचे ज्येष्ठ नेते प्रभाकर आप्पा सोनवणे वढोदे कर यांचा अध्यक्षतेखाली पार पडली.
बैठकीत ९ ऑगष्ट जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यासाठी उत्सव समिती गठीत करून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाज बांधवांनी हातभार लावावा व ९ ऑगष्टला मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी केले.
बैठकीत जितेंद्र सपकाळे, रोहन सोनवणे जळगाव, हरलाल कोळी रावेर, नामदेव कोळी यांनी मार्गदर्शन केले.
उत्सव समितीच्या अध्यक्षपदी भालोद येथील सरपंच प्रदिप कोळी तर उपाध्यक्षपदी निकिता कोळी फैजपूर व दीपक कोळी यावल, खजिनदार खेमचंद कोळी, मुकेश कोळी प्रसिद्धी प्रमुख पदी गोकुळ कोळी तर सदस्य म्हणून नितीन कोळी रावेर, मुरलीधर कोळी भुसावळ ,राज पाटील भुसावळ, भागवत कोळी तांदळवाडी, किरण कोळी तासखेडा – नितीन कोळी दहिगाव, वाल्मीक कोळी राजोरा, धनराज कोळी यावल, कैलास सपकाळे अंजाळे, दीपक कोळी किनगाव ,कुणाल सोनवणे बामणोद , शांताराम इंगळे चोपडा ,नितीन कोळी अंजाळे, रोहिदास कोळी पीप्री, भागवत कोळी अंजाळे, महेश नन्नवरे यावल ,नामदेव कोळी पाडळसा ,गोपाळ कोळी यावल, भरत कोळी यावल यांची निवड करण्यात आली.
बैठकीला यावल तालुक्यातील प्रविण कोळी संदिप सोनवणे ,प्रकाश कोळी, पदमाकर कोळी, अनिल कोळी, नितीन कोळी सह समाज बांधव उपस्थित होते, नऊ ऑगस्ट रोजी रेणुका देवी मंदिर यावल येथून विविध वेशभूषा सजीव देखावा पारंपारिक नृत्य कार्यक्रम सादर करून आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात येणार आहे. समाज बांधवांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन यावल तालुका आदिवासी दिन उत्सव समितीच्या वतीने समाजाचे ज्येष्ठ नेते प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी बैठकीत मार्गदर्शन केले प्रास्तविक खेमचंद कोळी यांनी केले तर आभार नितीत सपकाळे यांनी मानले .

