
यावल प्रतिनिधी )तालुक्यातील दहिगाव )येथील सार्वजनिक श्री विठ्ठल रुक्माई मंदिर आवारात तीन दिवसीय एस आय आर मतदार पुनर्नरीक्षण कॅम्पला उत्तम प्रतिसाद मिळाला असून यात सुमारे 4324 मतदारांपैकी 3216 मतदारांचे पुनर्नरीक्षण डिजिटल करण्यात आले. तर 1108 बाकी राहिलेले असून या त काही मयत व काही स्थलांतरित तर काही आलेले नाहीत यांचा समावेश आहे. आयोजिन एसआर कॅम्प मतदार पुनर्नरीक्षण सोमवार मंगळवार बुधवार या तीन दिवस सामाजिक कार्यकर्ते निलेश पाटील यांनी केले होते. याकरिता जिल्हा परिषद शाळा उर्दू शाळा माध्यमिक शाळा या तिघा शाळांमधून चार बी एल ओ यांची नेमणूक आहेत त्या व्यतिरिक्त म्हणून ग्रामपंचायत सदस्य पुंडलिक पाटील. पी डी चौधरी, नितीन पाटील, शैलेंद्र पाटील यांनी काम पाहिले. पाऊस सुरू असतानाही मतदारांनी या मोहिमेला प्रतिसाद दिला असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकंदरी त गावातील पुनर्नरीक्षणाचे काम आटोक्यात आलेले असल्याचे दिसून येत आहे उर्वरित मतदारांनी त्वरित या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केलेले आहे. अन्यथा ते वंचित राहतील असा इशारा हे देण्यात आला आहे. कॅम्पला तलाठी मिलिंद कुरकुरे, आशा वर्कर, प्राथमिक शिक्षक पंकज पाटील, सोनाली महाजन, बादशाह सर, तसेच उर्दू शाळेचे प्राथमिक शिक्षक यांची आवर्जून उपस्थिती होती,

