

यावल( प्रतिनिधी )तालुक्यातील दहिगाव येथील पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिगाव मध्ये आषाढी एकादशी निमित्त वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले, शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक विजय पाटील पंकज पाटील शिसोदे सर.सोनाली चौधरी सोनाली साळुंखे विमल,बारेला रामेश्वरी बडगुजर व व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देवेंद्र महाजन सदस्य कैलास पाटील तुषार माळी व ग्रामस्थांनी दिंडीचे शोभा वाढवली, विठुरायाच्या नामस्मंरणाने देवेंद्र महाजन यांच्या हस्ते पूजन करण्यात आले, गावातील प्रमुख चौकात संत जनाबाई यांचे जीवन चरित्र संदर्भात रामेश्वरी बडगुजर यांनी मार्गदर्शन करून आषाढी एकादशीचे महत्त्व काय आहे या संदर्भात माहिती विशद केली तर विद्यार्थ्यांनी संत जनाबाई च्या गोवऱ्या याबाबत नाटिका सादर केली, आणि भावगितावर नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मागितली, तर मुख्याध्यापक विजय पाटील पंकज पाटील, सोनाली महाजन, रामेश्वरी बडगुजर यांनी फुगडी खेळत, आनंद व्यक्त केला, याकरिता गावातील भजनी मंडळीच्या साह्याने विठुरायाच्या नामस्मंरणाने दिंडीला शोभा आली,

