

यावल (प्रतिनिधी )तालुक्यातील दहिगाव येथील प्रसिद्ध असलेले दीडशे वर्षाच्यावर इतिहास असलेले श्री विठ्ठल रुक्माई मंदिरात आषाढी एकादशी निमित्ताने अकरा क्विंटल साबुदाणा फराळ व अनेक सेवाभावी संघटना तर्फे केळ आणि चहा वाटप केली जाणार आहे. सन 1998 मध्ये 25 लाख खर्च करून बांधलेले परिसरातील एकमेव
भव्य मोठे विठ्ठल रुक्माई मंदिर दहिगाव येथे उभारण्यात आले आहे ,सालाबाद प्रमाणे मंदिरात आषाढी एकादशी निमित्ताने यात्रोत्सव पार पडतो, हजारो भाविक परिसरातून येथे दर्शनासाठी येत असतात, तर जळगाव तालुक्यासह अनेक ठिकाणी येथे येऊन दिवसभर भजने भारुडे गायन वादन करीत असतात ,मंदिर उभारण्याकरिता संस्थेचे ट्रस्ट अध्यक्ष सुरेश देवराम पाटील हेमराज महाजन कै, धागो पाटील प्रकाश सोनार आत्माराम महाजन, श्रीपत महाजन, यांचे सह अनेक प्रतिष्ठित गावकऱ्यांनी निधी जमा करण्याकरिता परिश्रम घेतले होते, मंदिर उभारण्यापासून दरवर्षी आषाढी एकादशीला यात्रोत्सव पार पडतो, गावकऱ्यांच्या परिश्रमातून फराळ वाटप केला जातो, काही संघटना रक्तदान शिबिर घेतात तर काही केळ वाटप चहा वाटप करीत असतात, श्री विठ्ठल रुक्माई मंदिरात सकाळी पाच वाजेपासून नवविवाहित नऊ जोडपे यांचे हस्ते श्री विठ्ठल रुक्माई ची पूजाअर्चा व होम पूजन करण्यात येणार आहे. चौकट घेणे,(यात्रोत्सवात स्वाभिमानी ग्रुप यांचे मार्फत 100 लिटर दूध खरेदी करिता ऑर्डर देण्यात आलेली असून ते मोफत चहा वाटप करणार आहेत. तर हिंदवी स्वराज्य ग्रुप यांचे तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे जळगाव येथील रेड प्लस ही संस्था रक्तदानाकरिता उपस्थित राहणार आहे. जास्तीत जास्त भाविकांनी रक्तदान करून एखाद्याचे जीवन वाचवावे असे आवाहन आयोजकांनी केलेले आहे.)
[२४/७, १९:१५] chaudharijivan819: दहिगावच्या प्रति पंढरपुरात आषाढी एकादशी निमित्त यात्रोत्सव, जिल्हाभरातून हजारो भाविक घेतील विठुरायाचे दर्शन,

