यावल ( प्रतिनिधी)तालुक्यातील किनगाव येथील श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कृती समिती, यांच्या वतीने आज दिनांक सात रोजी सायंकाळी श्रीराम मंदिर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मार्गे ग्रामीण रुग्णालय किनगाव येथे शांततेत मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये लहान थोर, महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते..
किनगाव गावातील ग्रामीण रुग्णालयाचे उदघाट्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन प्रणाली द्वारे 2024 या वर्षी करण्यात आले होते, परंतु दोन वर्ष उलटून सुद्धा अजून पर्यंत दवाखान्यात यंत्र सामग्री नाही, , कर्मचारी आणि रुग्णवाहिनी नाही.
समिती पाठपुरावा करीत असताना कोणत्याही प्रकारचे समाधान न झाल्याने, शेवटी आज आमच्या गावात रुग्ण कशा प्रकारे बैलगाडी मध्ये, ट्रॅक्टर मध्ये रुग्णालयात येतात, आणि त्यांना तिथे कोणत्याही प्रकारची सुवधा मिळत नसल्याने, जळगांव ला 25 किलोमीटर जावे लागते. आणि इतक्या लांब रुग्ण जाई पर्यंत दगावून जातात. हाच देखावा आम्ही आज जळगांव येथून आलेले डॉ. . मनोज पाटील यांना व मीडिया आणि जनतेला दाखवण्यात आला.
यासाठी आपल्या चोपडा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी सुद्धा शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करीत आहेत, आणि शासकीय अधिकारी यांनी सुद्धा सांगितले कि आमदार आम्हाला वेळोवेळी मदत करीत आहेत. त्यामुळे त्यांनी येत्या एक महिन्यात दवाखाना सुरु होईल असं डॉ. मनोज पाटील यांनी आश्वासन दिले.
निवेदन देणे साठी श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कृती समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि सर्व सभासद तसेच
ग्रामपंचायत सरपंच, उप सरपंच, सभासद व कर्मचारी
गावातील व परिसरातील सर्व लहान थोर, महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.



