यावल(प्रतिनिधी) तालुक्यातील दहिगाव येथील होमगार्ड जनार्दन कडू महाजन यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम नुकताच रविवारी पार पडला, यावेळी होमगार्ड पथकाचे वरिष्ठ अधिकारी तसेच यावल पोलीस निरीक्षक आणि मान्यवर उपस्थित होते, यावल येथील सातोद रस्त्यावरील होमगार्ड कार्यालयात महाजन यांचा सत्कार समारंभ करण्यात आला प्रसंगी पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, होमगार्ड समावेशक भगतसिंग बापू पाटील, शशिकांत फेगडे, तालुका समा वेशक विजय जावरे, दहिगाव चे माजी पोलीस पाटील संतोष पाटील, होमगार्ड संजय कवडीवाले, यांचे सह सर्व होमगार्ड बांधव आणि आप्त मंडळी सत्कार समारंभाला उपस्थित होते. त्यांनी केलेल्या 32 वर्षातील कार्यकाळात त्यांचे उल्लेखनीय कार्य होते. अनेक ठिकाणी त्यांनी नेमणूक केलेल्या कार्यपद्धतीचे पालन केलेले आहे यासाठी त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता, सत्कार संपल्यानंतर दहिगाव येथे त्यांचे राहते घरी सुद्धा गावकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले,


