. यावल (प्रतिनिधी )तालुक्यात शनिवार दिनांक 6 जून 2026 रोजी दुपारी साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या वादळामुळे मोठे नुठकसान झाले आहे. भुसावळ रस्त्यावर आणि फैजपूर रस्त्यावर दोन दोन वृक्ष कोसळल्याने रहदारी काही काळ बंद पडली होती.
तहसीलदारांची तातडीची कारवाई:
तहसीलदार मोहनमाला नाझीकर यांनी तातडीने संबंधित यंत्रणेला रस्त्यातून वृक्ष बाजूला हटवण्यासंबंधी सूचना केल्यावर रहदारी मोकळी झाली.
शेती व शाळेचे नुकसान
- वडोदे प्रसावदा येथील शिवरात सर्व्ह लाईट इंग्लिश मीडियम स्कूल शाळेतील संपूर्ण पत्र वादळामुळे उडून गेले. सध्या सुट्टी असल्यामुळे विद्यार्थिनी येथे नव्हते, त्यामुळे जीवित हानी टळली.
- राजोरा शिवारात तसेच राजोरा शिवारात सतीश रूपचंद पाटील यांच्या शेतातील 5000 केळीचे झाडे वादळामुळे जमीनदोस्त झालीत. यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्यात.
आमदारांचे आदेश
सांगोरी राजोरा, पिंपर्ड वडेदे, प्रसावदा या गावांमध्ये वादळाचा फटका बसलेला असून, यावल विधानसभेचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी तहसीलदार यांना भ्रमणध्वनीवरून सूचना देऊन तहसीलदार मोहनमाला पंचनामे करण्याचे सांगितले. त्यानुसार आज दिनांक सात रोजी आमदार अमोल जावळे तहसीलदार मोहनमालांनाझरीकर
[आज आदरणीय आमदार रावेर श्री अमोल जावळे यांनी राजोरे, वडोदे प्र सावदा ,अंजाळे या भागांमध्ये काल झालेल्या वादळी वारा मुळे नुकसानीची पाहणी केली. यावेळी तहसीलदार यावल मोहनमाला नाझिरकर,तालुका कृषी अधिकारी श्री भरत वारे,मंडळ अधिकारी अंजाळे, फैजपूर,तलाठी अंजाळे, राजोरा, पिंपरुड उपस्थित होते,



