यावल (प्रतिनिधी) शेतकरी नेता हरत नाही मात्र त्याला शासन हतबल करीत आहे. दिलेला शब्द पाळत नाहीत, सरसकट कर्ज माफी केल्याचे जाहीर करून ती पूर्ण केली नाही , यासाठी आम्ही लवकरच शासनाच्या जी, आर, ची होळी करून निषेध व्यक्त करणार आहोत आणि आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात येईल असे दिव्यांग प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ विजय पाटील यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.
निवडणूक आली की सातबारा कोरा हा नारा राजकीय पक्षांचा असतो, मात्र त्याप्रमाणे राजकीय पक्ष शेतकऱ्याला खेळणं समजत आहेत,
शेतकऱ्यांना स्वातंत्र्य, जात, धर्म, पक्ष आठवतो, पण शेतीमालाचा भाव, कर्ज, विज , पाणी आणि हमीभाव विसरला जातो.
“आता तरी ठरवा… जात मोठी की शेतकरी? पक्ष मोठा की आपल्या मुलांचं भविष्य?”
- शेतीमालाला हमीभाव नाही
- कर्जाचा वाढता बोजा
- बीज पुरवठा अनियमित
- पाण्याचे नियोजन अपुरे
- आत्महत्यांचे वाढते प्रमाण त्यातच अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी सरसकट कर्जमाफीची घोषणा केली ती सर्व खोल ठरली आहे आणि शेतकऱ्यांचे अवहेलना त्यांनी केलेली आहे सरसकट कर्जमाफी न केल्यास शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, याकरिता शेतकऱ्यांनी एकजूट होणे महत्त्वाचे आहे. जात धर्म, पक्ष यापलीकडे जाऊन शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी लढणे गरजेचे आहे. अधिवेशनात दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला नाही यासाठी आम्ही गाव पातळीवर शासनाच्या 2019 च्या जीआर ची होळी करून जाहीर निषेध करणार असल्याचे पुनश्च उद्गार हरिभाऊ पाटील यांनी केले आहे,


