यावल( प्रतिनिधी) तालुक्यातील कोळन्हावी येथील 24 वर्षीय तरुणास रात्री अज्ञात वाहनाने धडक मारल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 18 रोजी रात्री साडेबारा वाजता सुमारास घडली याबाबत यावल पोलिसात अज्ञात वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याबाबत यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की कोळन्हावी येथील पवन रवींद्र कोळी वय 24, हा दिनांक 18 जून रोजी रात्री साडेबारा वाजेचे सुमारास कोळ न्हावी डांभुर्णी रस्त्यावरील पाटाच्या चारी जवळ लघुशंकेसाठी उभा राहिला असता त्यास अज्ञात वाहनाने मागून ठोस मारली यात त्याचे डोक्याला जबर मार लागल्याने त्यास तत्काळ यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले, मयताचे शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी तुषार सोनवणे यांनी केले, याबाबत यावल पोलिसात उमेश दिलीप परदेशी राहणार कोळन्हावी यांनी फिर्याद दिल्यावरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध भादवी कलम 23४/२६ डीएनएस १०६ (१) २८१,१२५,(ए बी) मोटर वेहिकल ऍक्ट १३४, या सह अन्य कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, घटनेबाबत परिसरात तर्कवितर्क वर्तविले जात आहेत, पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार वसंत बेलदार हे करीत आहेत,


