यावल( प्रतिनिधी) तालुक्यातील दहिगाव येथील अल्पभूधारक तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र मृत्यूशी झुंज देत अखेर आठव्या दिवशी आज दिनांक 18 रोजी पहाटे त्याचा मृत्यू झाला झाला, डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्यामुळे त्याने ही आत्महत्या केली असल्याचे स्पष्ट झाले, झालेल्या प्रकारामुळे दहिगाव व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे,
याबाबत यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, दहिगाव येथील रहिवाशी विश्वास उर्फ पिंटू रामकृष्ण पाटील वय 40 याचेवर स्टेट बँकेचे, तसेच खाजगी सावकारांचे कर्ज आहे, कर्जाची संख्या मोठी असल्याने त्याला ते असह्य होत होते, त्या विचारांनी तो विचारहिन राहत होता, कर्ज कसे फिटेल, त्यामुळे तो व्याकुळ होऊन त्याने अखेर 11 जून रोजी सकाळी विष प्राशन केले होते, त्यास तत्काळ उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयात उपचार करून भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले, तेथून त्याला गोदावरी रुग्णालयात दाखल करण्यात आले, आठवडाभर मृत्यूशी झुंज देत अखेर त्याची प्राणज्योत आज दिनांक 18 रोजी पहाटे मावळली, याबाबत यावल पोलिसात खबर दिले वरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे, मयताचे पश्चात पत्नी, आई, मुलगा ,मुलगी दोन भाऊ वहिनी असा परिवार आहे, तो मनोज आणि ईश्वर चौधरी यांचा लहान भाऊ होता. असे अनेक तरुण दहिगाव विका सहकारी संस्थेत तसेच बँकेच्या कर्जात थकबाकीदार म्हणून अडकलेले आहेत, त्यांच्यावर शासन मात्र अन्याय करीत असल्याचे दिसून येत आहे, याकरिता शासनाने सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी यातून होत आहे, कर्जबाजारी शेतकऱ्याला अखेर आपले जीवन संपवावे लागते हे मात्र शासनाच्या लक्षात येत नसल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे,


