यावल( प्रतिनिधी) यावल येथील शेतकी संघात शेती संघाचे चेअरमन नारायण चौधरी यांचे अध्यक्षतेखाली अपंग मेळावा घेण्यात आला, यात 61 लाभार्थ्यांचे अर्ज भरण्यात आले, आज दिनांक 21 जून रोजी आपल्या यावल – रावेर विधानसभा मतदार संघातील आ, यांच्या वाढदिवस सप्ताह निमिताने तालुक्यातील दिव्यांग बाधवांसाठी मोफत ईरिक्षा , बॅटरीकवर चालणारी बाईक , नास्ता सेंटर , कलीपर, कुबड्या , कर्णयंत्र इसह ६१ दिव्यांगांचे मोफत फॉम भरण्यात आले गरजू गरीब दिव्यांग बाधवांना शासनाचे ऑनलाईन पोर्टल फॉम साठी कुठलीही सुविधा नसल्याने सदर शिबीरात ऑफलाईन फॉम भरून कार्यक्रमाचे आयोजक श्री अरुण शामराव पाटील जिल्हा अध्यक्ष दिव्यांग आघाडी जळगांव जिल्हा पूर्व यानी जळगांव जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्याचे ठरविले आहे सदर कार्यक्रमात प्रस्तावीत भाषणात दिव्यांग बाधवांच्या अडीअडचणी संदर्भात व शासनाच्या विविध योजना सोयी सुविधा बाबतीत माहिती आणी मार्गदर्शन करून संबंधीत योजनांचे प्रस्ताव तयार करून दाखल करून पोहच घरपोच सेवा पुरवण्याच्या आश्वासन दिले


