यावल (प्रतिनिधी)तालुक्यात समग्र शिक्षा अभियान योजनेचे सामाजिक अंकेक्षण अंतर्गत जनसुनावणी प्रक्रिया नुकतीच पार पडली. यावेळी यावल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी फिरोज पठाण,शिक्षण विस्ताराधिकारी सरोज पाटील, सामाजिक अंकेक्षण सोसायटीचे जिल्हा साधन व्यक्ती विलास भाऊराव गजबे,तालुक्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख उपस्थित होते.
एप्रिल 2026 मध्ये यावल तालुक्यातील 140 प्राथमिक शाळांचे महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी मुंबई यांनी सामाजिक अंकेक्षण प्रक्रिया पूर्ण केली होती.या प्रक्रियेमध्ये शाळांमधील उणिवांची,त्रुटींची यावेळी जन सुनावणी घेण्यात आली.
तालुक्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापकांनी शाळांमध्ये असलेल्या उणिवा अथवा त्रुटींची पूर्तता केल्याचे यावेळी जनसुनावणी पॅनलला सांगितले.
जनसुनावणी पॅनल मध्ये सामाजिक अंकेक्षण सोसायटीचे जिल्हा सादन व्यक्ती विलास भाऊरावजी गजबे, शिक्षण विस्ताराधिकारी सरोज संजय पाटील, बचत गट प्रतिनिधी सरला संजय चौधरी, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी डॉ. प्रमोद सोनार, शैक्षणिक तज्ञ प्रतिनिधी संजय श्रीकृष्ण चौधरी यांनी जन सुनावणीचे चे कार्य पार पाडले.
यावेळी किनगावचे मुख्याध्यापक संजीव शेटे,शरीफ तडवी यांनी माहिती सांगितली. गटशिक्षणाधिकारी फिरोज पठाण, शिक्षण विस्तार अधिकारी सरोज पाटील यांनी मार्गदर्शन केले. योगेश इंगळे यांनी सूत्रसंचालन केले तर श्रीकांत मोटे यांनी आभार मानले.


