यावल ( प्रतिनिधी ) तालुक्यातील श्रीक्षेत्र अंजाळे ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा वारकरी संप्रदाया मध्ये वारीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि वारी म्हटलं वारकरी म्हटलं की एक नाव संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यासमोर येतात ते म्हणजे वारकरी अलंकार श्री गुरु जगन्नाथ महाराज अंजाळेकर पूजनी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षापासून म्हणजे १९२८ साल पासून ही वारी सुरू केली महाराजांच्या पश्चात सुद्धा त्यांचे गादीपती श्री धनराज महाराज अंजाळेकर समर्थपणे ती परंपरा पुढे नेत आहेत काल २३ तारखेला श्रीक्षेत्र अंजाळे येथे जगन्नाथ महाराज अंजाळेकर संस्थानचे अध्यक्ष दीपक नरोत्तम चौधरी यांनी महाराजांच्या पादुकांचा अभिषेक केला अंजाळे गावातून दिंडी ग्रामदैवत लक्ष्मीनारायण मंदिरात आणि तिथून पुढे श्री गुरु जगन्नाथ महाराज यांच्या वाड्यावर मुक्काम होऊन रात्री गादीपतींचे कीर्तन आणि २४ तारखेला पंढरपूरकडे दिंडीचे प्रस्थान झालं दिंडीचे विणेकरी श्री चिंतामण महाराज श्री भरत महाराज म्हैसवाडी कर शालिग्राम महाराज जितेंद्र महाराज संजय महाराज सुभाष महाराज राजू राणे सुरत संस्थेचे अध्यक्ष विश्वस्त आणि शेकडो भाविक उपस्थित होते


