

यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील पाडळसे येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत गटशिक्षणाधिकारी फिरोज पठाण यांनीआज दिनांक 27 जून 2026 शनिवार रोजी जि. प .उर्दू शाळा पाडळसे ता.यावल येथे माननीय गटशिक्षण अधिकारी फिरोज पठाण साहेब यांनी भेट दिली. याप्रसंगी पठाण यांनी निपुण सराव चाचणी क्रमांक दोन चे प्रश्न विद्यार्थ्यांना विचारले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून इयत्ता चौथीची विद्यार्थिनी सारिया मोहिब अली सैय्यद हिला 500 रुपये तर इयत्ता पहिलीची लाजाळू विद्यार्थिनी आफिया सलमान टकारी हिला सुद्धा पाचशे रुपये बक्षीस दिले.
दरम्यान अत्यंत आनंददायी वातावरणात गटशिक्षण अधिकारी पठाण साहेबांनी विद्यार्थ्याशी हितगुज केले.गणितीय संकल्पना व गणितीय उदाहरणे स्वतः सोडवून दाखवले आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी प्रोत्साहित केले.तसेच एका विद्यार्थ्यांशी अत्यंत लाडकेपणाने चाऊ म्याऊ हा खेळ सुद्धा खेळला. पठाण यांनी लहानशा मुलाने असं खेळ खेळणं हे सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी हा क्षण अचंभित करणारा होता.हे पाहून विद्यार्थी व शिक्षक भारावून गेले आणि जोरदार टाळ्या वाजवून या अविस्मरणीय क्षणाला साद घातली.
तद्नंतर शिक्षकांना मार्गदर्शन करताना गुणवत्ता पूर्ण शिक्षण, आनंददायी शनिवार, निपुण सराव चाचणी,मोफत गणवेश योजना व शालेय पोषण आहार आदींबाबत मार्गदर्शन करून योग्य ती कारवाई करण्याचे सुचित केले.यावेळी शालेय पोषण आहाराचा आस्वाद घेऊन तारीफ केली.
याप्रसंगी शाळेच्या वतीने खेमचंद भाऊ कोळी यांच्या हस्ते आदरणीय पठाण साहेब यांचे स्वागतही करण्यात आले.
*…
Nida e Taleem

