
यावल (प्रतिनिधी)प्रशासन विभागाचे दबंग आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुटका व भेसळयुक्त खाद्यपदार्थ व बनावट दुध विक्रेत्यांवर कारवाईच्या धडाक्याने चांगल्या चांगल्या घाम सोडले असुन, खूलेआम विक्रीला जाणारा गुटका विक्री व बनावट दुध विक्रीला चांगलाच चाप बसल्याचे दिसुन येत आहे . महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त अन्न व औषद्य प्रशासन विभागा, FDAचे आयुक्त म्हणुन कार्यभार सांभाळल्यापासुन तुकाराम मुंढे यांनी गेल्या काही दिवसाच राज्यभरात अवैद्यरित्या गुटका व बनावट भेसळयुक्त दूध आणी खाद्यपदार्थ व्यवसाय करणाऱ्यांवर तसेच कालबह्यय झालेल्या औषधी विकणाऱ्या माफियावर कारवाई धडाका लावल्याने त्यांचे धाबे दणाणले आहे . राज्यातील सर्वसामान्य नागरीकांच्या वतीने अन्न व औषद्य प्रशासन FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे . दरम्यान यावल तालुक्यात वडापाव कचोरी पोहे आदी विक्रते आणी हॉटेल व्यवसायीकां कडून मोठा प्रमाणावर घातक कमिकल मिश्रीत पेपर रद्दीचा खाद्यपदार्थ ग्राहकांना देण्यात येत असुन, सर्वनियम धाब्यावर ठेवुन हॉटेल व्यवसायीकांकड्रन अत्यंत घाणीरडे तेलाचा वापर करतांना दिसून येत असून यावर देखील कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे . ग्रामीण भागातही खारामाल विक्रेते वृत्तपत्र रद्दीचा सर्रास वापर करीत आहे. सर्व नियम त्यांनी धाब्यावर ठेवले आहे. दहिगाव ,सावखेडा सिम, कोरपावली, किनगाव. यासह अनेक गावांमध्ये प्रमुख चौकांमध्ये हा माल रद्दीतून दिला जात आहे रद्दी मध्ये वापरल्या गेलेल्या केमिकल मुळे कॅन्सर होण्याची दाट शक्यता आरोग्य विभागाने व अन्न प्रशासन कायद्यात नमूद केलेली आहे तरी देखील व्यावसायिक त्याला दाब देत नसल्याचे स्पष्ट होत आहे याबाबत तुकाराम मुंडे यांच्याकडे यावल येथून तक्रारी गेलेल्या आहेत अचानक पथक येऊन ग्रामीण भागात पाहणी करणार आहे,

