
यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील शिरसाड येथील वीस वर्षाच्या तरुणाचा विहिरीत डोकावत असताना तोल जाऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली, याबाबत यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिरसाळ येथील राजेश रमेश भिलाला वय 20 हा त्याचे घरासमोरील विहिरीत मंगळवारी डोकावत असताना त्याचा अचानक तोल गेला आणि तो विहिरीत पडून पाण्यात बुडून मयत झाला हा प्रकार नागरिकांच्या लक्षात येताच नागरिकांनी तत्काळ त्याला विहिरीच्या बाहेर काढले आणि यावल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला मयत घोषित केले आहे या प्रकाराने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे, याबाबतची खबर रमेश भिलाला याने दिल्यावरून यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार रोहित गणेश हे करीत आहेत

