
यावल (प्रतिनिधी)जिल्हा परिषद जळगावचे प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी सकाळी दहा वाजता जिल्हा परिषद केंद्र शाळा, डांभुर्णी येथे अचानक भेट देऊन शाळेच्या शैक्षणिक कामकाजाचा आढावा घेतला.
भेटीदरम्यान त्यांनी निपुण भारत अभियान अंतर्गत सुरू असलेल्या विविध उपक्रमांची पाहणी केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना नियमित अभ्यास, वाचन, लेखन व गणितीय कौशल्ये विकसित करण्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
यानंतर शिक्षकांशी संवाद साधताना निपुण भारत अभियानाच्या प्रभावी नियोजन, अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी आवश्यक उपक्रम, विद्यार्थीनिहाय प्रगती नोंदी तसेच अध्यापन अधिक परिणामकारक करण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान विकसित करण्यासाठी नियोजनबद्ध आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले.
या भेटीमुळे शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी ही भेट निश्चितच प्रेरणादायी ठरली.

