

.यावल(प्रतिनिधी)) येथील पंचायत समिती सभागृहात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे जयंती निमित्त कृषी दिन साजरा करण्यात आला अध्यक्षस्थानी कृषी भषण पुरस्कार कृत नारायण चौधरी हे होते. सर्वप्रथम आज माजी पंचायत समिती सभापती संध्या किशोर महाजन यांचे निधन झाल्याने त्यांना सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात आली.सन 2025 सन 2026 या काळात आलेल्या आसामी संकटावर मात कसा करायचा या सदर्भात अध्यक्षीय भाषणात चौधरी यांनी आपले विचार मांडत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले, प्रसंगी सन 2025 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त उत्पन्न काढले अशा शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आले प्रामुख्याने प्रथम नितीन भोजराज राणे वडोदे प्रसावदा ज्वारी पिकात प्रथम. तृतीय दिलीप देवचंद चौधरी आमोदा यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तर मका पिकात सन 2025 26 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त उत्पन्न काढले अशा तीन शेतकऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला यात प्रामुख्याने रजनी प्रकाश मराठे शिरसाळ लीलाधर केशव भारंबे आणि संदीप गणेश सोनवणे यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात तहसीलदार मोहन मला नाझरी कर. गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड. तालुका कृषी अधिकारी भरत वारे यांनी कृषी संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तर चंद्रकांत ढाले मंडळ अधिकारी, धीरज नेहते कृषी विज्ञान शास्त्रज्ञ पंचायत समिती यांनी निनो च्या प्रभावित पणाबद्दल होणारे परिणाम आणि त्यावर केल्या जाणारे उपाय योजना संदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी अधिकारी एकनाथ चौधरी यांनी केले तर आभार गोकुळ सोनवणे यांनी मांनले. कार्यक्रम आटोपल्यानंतर पंचायत समितीच्या आवारात विविध जातीच्या वृक्षांची लागवड ही करण्यात आली.

