
यावल प्रतिनिधी प्रहार दिव्यांग क्रांती संघटना संस्थापक अध्यक्ष मा ना आमदार बच्चूभाऊकडू मा राज्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रहार दिव्यांग क्रांती संघटना यावल तालुक्याच्या च्या वतीने यावल येथे यशोदाआई फाऊंडेशन वॄधआश्रम सेवा केंद्र येथे जावून तेथे फळ वाटप करण्यात येणार आहे , तसेच दहिगांव ता यावल येथे नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे व हरीजन गिरीजन वसतिगृह दहिगांव ता यावल येथे वह्या व पेन वाटप करण्यात येणार आहे , जामुन झिरा ता यावल येथे वह्या पेन वाटप करण्यात येणार आहे, साकळी ता यावल येथे मदरसा ए, अहले सुन्नत वल जमात ख्वाजा गरीब नवाज येथे वह्या पेन वाटप करण्यात येणार आहे, साकळी येथे भवानी मंदिरा परिसर जवळील मुलांना वह्या पेन वाटप करण्यात येणार आहे, तरी तालुक्यातील सर्व प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमांना उपस्थित रहावे असे आवाहन
हरी विजय पाटील प्रहार दिव्यांग क्रांती संघटना यावल तालुका अध्यक्ष,प्रतीक वासुदेव पाटील तालुका उप अध्यक्ष , वासुदेव डिंगबर पाटील तालुका उप अध्यक्ष, ललित कडू पाटील तालुका सचिव रामदास सोपान पाटील तालुका उप अध्यक्ष,दिलीप आमोदेकर,अरूण ठाकूर, सौ मिनाबाई जनार्दन देशमुख प्रहार महिला शहर अध्यक्ष यावल

