

यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील दहिगाव येथील सुरेश आबा नगरात रस्त्यांची दुरावस्था तर जामनझिरा रस्त्यालगत दही गावातील डबक्याने अनेकांच्या दुर्घटना .. होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दहिगावातील सुरेश आबा नगरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे रस्ते तयार करण्याची मागणी रहिवासी करीत आहेत. पावसामुळे साचलेल्या पाण्यात. बैलगाडी हाकणेही कठीण होत आहे, नगरातील रस्त्यांची दुरावस्था झालेली असल्याने ही रस्ते काँग्रेस करण करावे अशी मागणी होत आहे तसेच काही रस्ते करण्यात आलेले आहेत ,ते अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत, त्यातही पाणी साचत आहे. त्यातच लगतच असलेल्या नगरातही नुकताच गेल्या वर्षी काँक्रीटकरण करण्यात आले आहे पण त्या रस्त्यावर तडा जाऊन तो लवकरच खराब होईल असे चित्र स्पष्ट होत आहे, त्यातच जामुन जीरा रस्त्यावरील वस्तीत काँक्रीट झालेले आहे. काँक्रीट करंट झालेल्या पुढील भागात पाणी साचत आहे पाणी वाहून जाण्यासाठी गटारची सुविधा नाही. अर्धा किलोमीटर अंतर आणखी काँक्रीट रस्ता मंजूर झालेला आहे मात्र तो अद्यापही करण्यात आलेला नाही. त्यामुळे रहिवाशांना खूप त्रास सहन करावा लागत आहे या ठिकाणी अनेकांच्या मोटरसायकली घसरून मोटरसायकल स्वार जखमीही झालेले आहेत. हा रस्ता त्वरित काँक्रीट करावा अशी मागणी रहिवासी करीत आहेत.

