
यावल |( प्रतिनिधी) यावल येथील शेतकी संघात आज रविवारी दुपारी बारा वाजता आदिवासी तडवी भिल्ल समाजाच्या उत्सव समितीची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे बैठकीत नऊ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आदिवासी दिनानिमित्त नियोजन संदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील सर्व आदिवासी बांधवांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विविध सामाजिक, सांस्कृतिक व जनजागृतीपर उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच कार्यक्रमाचे नियोजन, जबाबदाऱ्यां सोपवण्यासंदर्भात आणि विविध समित्यांची स्थापना यावरही विचारविनिमय केला जाणार आहे.
यावेळी समाजातील सर्व ज्येष्ठ नागरिक, समाजसेवक, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक-युवती तसेच सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बैठकीला सहकार्य करावे, असे आवाहन आदिवासी तडवी भिल उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
समाजाची एकजूट, परंपरा आणि संस्कृतीचे जतन करत यंदाचा जागतिक आदिवासी दिन उत्साहात व भव्य स्वरूपात साजरा करण्यासाठी सर्वांनी बैठकीस उपस्थित राहावे, असेही समितीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

