
यावल(प्रतिनिधी) तालुक्यातील दहिगाव येथे सरकारी दवाखान्यात गोदावरी फाउंडेशनचे च्या वतीने आज दिनांक 20 रोजी मोफत डोळ्यांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर पार पडले या शिबिरात 27 रुग्णांनी लाभ घेतला असून चार रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी हलविण्यात आले आहे. यात शांताबाई पवार चेंबाबाई भालेराव इमलाबाई अत्तर दे कुसम बाई सोनवणे रमाबाई अडकमोल. योगेश सोनवणे जनार्दन बाविस्कर सोनाबाई पाटील लिलाबाई पाटील राजाराम महाजन भास्कर नागो फेगडे संध्या बाविस्कर उत्तम बाई महाजन दिनकर फेगडे यांचे सह 27 लोकांची तपासणी करण्यात आली, रुग्णांची तपासणी प्रसिद्ध डॉक्टर गोदावरी फाउंडेशन चे टीम यांनी केली
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव खुर्द तर्फे आयोजित यावल तालुक्यातील मोफत वैद्यकीय शिबिरांचे वेळापत्रक आहे. पुढील मोफत डोळ्यांचे शस्त्रक्रिया शिबिराचे कार्यक्रम आयोजित
1 20 जुलै सावखेडा – चारोळी – दहिगाव
2 22 जुलै भालोद – अट्टावल – चिखली
3 24 जुलै अंजाळे – राजूरा – चिखली
4 27 जुलै निमगाव – बोरावल – बोरावल बु
5 29 जुलै चितोडा – टेंभी
6 31 जुलै टाकरखेडा – पिंप्री – भालशिव
7 03 ऑगस्ट दगडी – मनवेल – थोरगव्हाण बु
8 05 ऑगस्ट पिंपरूड – विरोधा – आमोदा
9 07 ऑगस्ट बामणोद – म्हैसवाडी – भोरटेक
10 10 ऑगस्ट पाडळसा – वनोली – कोसगाव – पिळोदा
11 13 ऑगस्ट दुसखेडा – कासवे – अकलूद
12 18 ऑगस्ट रूईखेडा – साकळी – शिरसाळ
शेवटचे शिबिर*: 18 ऑगस्ट रोजी रूईखेडा-साकळी-शिरसाळ येथे आहे. असे एकूण बारा शस्त्रक्रिया शिबिरे 18 ऑगस्टपर्यंत होणार आहेत असे आयोजक गोदावरी फाउंडेशन तर्फे कळविण्यात आले आहे.

